नळ चालू ठेवला म्हणून सुरक्षारक्षकाचा खून

नळ चालू ठेवला म्हणून सुरक्षारक्षकाचा खून
Published on

नळ चालू ठेवल्याचा जाब विचारला म्हणून खून

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ११ : डोंबिवली पश्चिम भागात किरकोळ कारणावरून एका सुरक्षा रक्षकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. नळ चालू ठेवून पाणी वाया का घालवतोस, असा जाब विचारल्याने झालेल्या वादातून संतप्त तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी अक्षय जाधव याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपर परिसरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे ही घटना घडली. सुरक्षा रक्षक उमेश वाघ (वय ३५) यांनी अक्षय जाधव (वय ३०) याला नळ चालू ठेवून पाणी वाया घालवण्याबाबत जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि संतप्त झालेल्या अक्षयने उमेश यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात उमेश वाघ गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com