देहविक्रीप्रकरणी एका दलाल महिलेस अटक ; तीन पीडित मुलींची सुटका,एका अल्पवयीन मुलीचा समावेश

देहविक्रीप्रकरणी एका दलाल महिलेस अटक ; तीन पीडित मुलींची सुटका,एका अल्पवयीन मुलीचा समावेश
Published on

देहविक्रीप्रकरणी महिलेस अटक
तीन पीडित मुलींची सुटका, एका अल्पवयीन मुलीचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : असहाय्य मुलींना फूस लावून देहविक्रीच्या व्यवसायात ओढणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षेने गुरुवारी (ता. १२) अटक केली. तिच्या तावडीतून तीन पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ठाणे शहराच्या कल्याण- शिळ रोड परिसरातील एका ढाब्यावर एक महिला दलाल काही पीडित व असहाय्य मुलींना फूस लावून वेश्यागमनासाठी बोलवणार असल्याची माहिती पूर्णता संस्था (एनजीओ) यांच्यामार्फत ठाणे गुन्हे शाखेच्या अंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळाली. त्यानुसार, त्या कक्षाच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी सापळा रचून या दलाल महिलेला अटक केली. तसेच तिच्या तावडीतून तीन पीडित मुलींची सुटका करण्यात आली. त्यामध्ये एक अल्पवयीन पीडित मुलगी असून याप्रकरणी त्या दलाल महिलेविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त पराग मणेरे तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रतिबंध) रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com