महिला सशक्तीकरण शिखर परिषदेचे आयोजन
महिला सशक्तीकरण शिखर परिषदेचे आयोजन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई, ता. १४ मार्च : ‘चेंबर फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मीडियम बिझनेसेस’ (सीएएसएमबी)तर्फे मंगळवारी (ता. १७) सीप्झ, अंधेरी (पूर्व) येथील भारतरत्नम सभागृहात ‘प्रेरणा’ महिला सशक्तीकरण शिखर परिषद आणि संस्थेचा ६वा स्थापना दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी १ वाजल्यापासून सुरू होईल. या परिषदेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, दूरदर्शन अभिनेते व माजी खासदार डॉ. नितीश भारद्वाज हे गौरवाचे अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
उद्घाटन समारंभात सीएएसएमबीचे अध्यक्ष डॉ. प्रबोध हळदे स्वागतपर भाषण करतील. सन्माननीय अतिथी म्हणून अजय झुनझुनवाला (व्यवस्थापकीय संचालक, जेआर ॲग्रो), पुरू गुप्ता (संस्थापक, ट्रू एलिमेंट्स) आणि डॉ. सत्येन कुमार पंडा (सल्लागार, गुणवत्ता आश्वासन, एफएसएसएआय, भारत सरकार) उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे मुख्य भाषण पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी, कुलपती, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी करतील. सीएएसएमबीचे राष्ट्रीय अध्यक्ष नीलेश लेले आभारप्रदर्शन करतील.
सीएएसएमबीचे राष्ट्रीय अध्यक्ष नीलेश लेले यांनी सांगितले, की महिला उद्योजकांना मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याच्या उद्देशाने ‘प्रेरणा’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘विचारनेतृत्व परिसंवाद’ सत्रात उद्योग, संशोधन व प्रशासन क्षेत्रातील मान्यवर महिला तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते एमएसएमई, महिला उद्योजकता व अन्न-कृषी प्रक्रिया क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच डॉ. नितीश भारद्वाज यांचे प्रेरणादायी भाषणही या सोहळ्याचे विशेष आकर्षण असेल. रात्री ८.३० वाजता स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

