बेलापूरमध्ये भरधाव स्कॉर्पिओने पदपथावरुन चालणाऱया महिलेला चिरडले

बेलापूरमध्ये भरधाव स्कॉर्पिओने पदपथावरुन चालणाऱया महिलेला चिरडले

Published on

भरधाव चारचाकीने महिलेला चिरडले
बेलापूरमधील अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : बेलापूर सेक्टर आठ परिसरात कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने एका महिलेला धडक दिल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) घडली. पदपथावरून चालत जाणाऱ्या एका महिलेला धडक देऊन चिरडल्यानंतर कारने तिला दूरपर्यंत फरपटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात परिसरात उभ्या असलेल्या सहा वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सीबीडी बेलापूर सेक्टर आठमधील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये राहणारे आरोपी आकाश चंद्रकांत कांबळे (२६) व विक्रम गंगाधर कांबळे (१९) हे दोघे शुक्रवारी सायंकाळी सेक्टर आठमधून कारने प्रवास करीत होते. विक्रम कांबळे कार चालवत होता. या वेळी त्यांची कार अरेंजा कॉर्नर परिसरात आली असताना अचानक त्याचा ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगाने आलेली कार थेट पदपथावर चढली. त्यानंतर कारने तेथील पदपथावरून चालत जाणाऱ्या मोहिनी पोपट शिंदे (३०) या महिलेला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे महिला कारच्या चाकाखाली चिरडली गेली. त्यानंतर कारने तिला काही अंतर तसेच फरपटत नेले. त्यानंतर या कारने एका रिक्षाला, एका दुचाकीला आणि रस्त्यालगत असलेल्या इतर वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत सर्व वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात जखमी झालेल्या तरुणीला तातडीने बेलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी आकाश कांबळे व विक्रम कांबळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचेदेखील अरुण पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com