केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पराग मेस्त्री याचे यश

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पराग मेस्त्री याचे यश

Published on

कल्याणच्या पराग मेस्त्रीचे यूपीएससी परीक्षेत यश
५५५ व्या क्रमांकासह मारली बाजी; शिवसेनेकडून गौरव

डोंबिवली, ता. १६ : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कल्याणचा सुपुत्र पराग जयंत मेस्त्री याने देदीप्यमान यश संपादन केले आहे. ऑल इंडिया रँकिंगमध्ये ५५५ वा क्रमांक पटकावत परागने प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. त्याच्या या यशाबद्दल कल्याण शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पराग मेस्त्री यांच्या या यशाची दखल घेत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी साळवी यांच्या हस्ते परागचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि गौरवपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच प्रोत्साहन म्हणून पाच हजार रुपयांची रोख रक्कम देऊन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. परागने मिळवलेले हे यश कल्याणमधील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कोणतीही स्पर्धा परीक्षा जिंकता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे, अशी प्रतिक्रिया विजय साळवी यांनी दिली.

विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श
अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत यश मिळवून परागने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक युवक परागचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षांकडे वळतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com