रुग्णालयाच्या ‘आयसीयू’त उंदराने कुरतडला हात
रुग्णालयाच्या ‘आयसीयू’त उंदराने कुरतडला हात
भाईंदरमध्ये १२ तासांत महिलेचा मृत्यू
भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : भाईंदर पश्चिमेतील पं. भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या ८९ वर्षीय महिलेचा हात चक्क उंदराने कुरतडल्याची घटना घडली. ही बाब सोमवारी (ता. १६) पहाटे लक्षात आली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या महिलेचा मृत्यू झाला.
सुहासिनी माठेकर असे मृत्यू महिलेचे नाव असून, त्यांना श्वास घेण्यास त्रास व हृदयविकाराचा झटका आल्याने १२ मार्चला पं. भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे सुमारे ५.३० वाजता त्यांचा हात उंदराने कुरतडल्याचे आढळून आले. त्यांच्या हाताला मोठी जखम झाली होती. ही बाब माठेकर यांच्या मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिचारिकेला माहिती दिली; मात्र सुरुवातीला ती जखम ‘बेड सोर’ असल्याचे सांगण्यात आले. चादरीवर उंदराचे ठसे दिसत असल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. डॉक्टरांनी तातडीने उपचार केले; मात्र सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माठेकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अतिदक्षता विभागात यापूर्वीही उंदीर दिसल्याची तक्रार करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप माठेकर यांची कन्या मीनल माठेकर-देसाई यांनी केला. या घटनेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत जबाबदारांवर कारवाईची मागणी केली. महापौर डिंपल मेहता व उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आणि निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली.
...
या घटनेला जबाबदार धरून अतिदक्षता विभागातील एक डॉक्टर आणि एक परिचारिका यांना कार्यमुक्त करून जिल्हा सिव्हिल रुग्णालयात परत पाठविण्यात आले आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. माठेकर यांची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती; तरीदेखील त्यांच्या मृतदेहाची शवचिकित्सा केली जाणार आहे.
- डॉ. जाफर तडवी, वैद्यकीय अधीक्षक, पं. भीमसेन जोशी रुग्णालय, भाईंदर पश्चिम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

