अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाची सुटका
उपमुख्यमंत्री शिंदेंचा मोठ्या भावासारखा मदतीचा हात
मुलाच्या सुटकेनंतर विशाखा सुभेदार यांनी मानले आभार
ठाणे, ता. १६ : युद्धजन्य परिस्थिती आणि कायदेशीर तांत्रिक अडचणींमुळे कुवेतमध्ये अडकलेला अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार अखेर मायदेशी सुखरूप परतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारने केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे ही सुटका शक्य झाली, अशी भावना व्यक्त करीत सुभेदार यांनी उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानले.
विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय हा एका खासगी कंपनीत कामासाठी कुवेतला गेला होता; मात्र तिथे त्याला कामाच्या ठिकाणी काही तांत्रिक आणि कायदेशीर गुंतागुंतीचा सामना करावा लागला. कंपनीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने आणि पासपोर्टशी संबंधित अडचणींमुळे तो तिथे अडकून पडला होता. परदेशात मुलगा अडचणीत असल्याने सुभेदार कुटुंब प्रचंड चिंतेत होते. विशाखा सुभेदार यांनी या कठीण काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिंदे यांनी तत्काळ परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्व कायदेशीर अडथळे दूर झाले आणि अभिनयचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला.
मुलाच्या सुटकेनंतर विशाखा सुभेदार यांनी ठाणे येथील निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी त्या अत्यंत भावुक झाल्या होत्या. एका आईच्या नात्याने मी खूप हतबल झाले होते. पण उपमुख्यमंत्र्यांनी कशाचीही वाट न पाहता मोठ्या भावासारखी साथ दिली. त्यांनी केलेल्या तत्पर मदतीमुळेच माझा मुलगा आज सुखरूप माझ्यासमोर आहे, अशी प्रतिक्रिया विशाखा सुभेदार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

