मधुर म्हात्रे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मधुर म्हात्रे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Published on

नगरसेवक मधुर म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

कल्याण, ता. १७ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. प्रभाग क्रमांक १३ (ड) मधील शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हात्रे यांनी हातावर शिवबंधन बांधले.

निवडणुकीच्या वेळी उमेदवारी नाकारल्याने म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी भाजपच्या दिग्गज उमेदवारासह माजी महापौरांचा पराभव करून अनपेक्षित विजय मिळवला होता; मात्र विजयानंतर गेल्या दोन महिन्यांपासून ते ‘नॉट रिचेबल’ होते. त्यांच्या या गूढ शांततेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते, ज्यावर आता या पक्षप्रवेशाने पडदा पडला आहे. या वेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाकरे गटाकडून टीकेचा वर्षाव
मधुर म्हात्रे यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटात संतापाची लाट आहे. ज्या पक्षाने उमेदवारी देऊन निवडून आणले, त्यांच्याशीच म्हात्रे यांनी प्रतारणा केली, अशी टीका स्थानिक नेत्यांकडून केली जात आहे. प्रभाग १३ (ड) मधील म्हात्रे यांचा विजय हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जात होता. आता ते सत्ताधारी गटात सामील झाल्यामुळे या प्रभागातील आणि महापालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com