केमिकलमध्ये अडकलेल्या सापाला जीवनदान;
केमिकलमध्ये अडकलेल्या सापाला जीवदान
सर्पमित्र अष्टविनायक मोरे यांची धाडसी कामगिरी
नेरूळ, ता. १७ (बातमीदार) : खारघर येथे केमिकलमध्ये अडकलेल्या सापाला जीवदान देण्यात सर्पमित्राला यश आले आहे. धामण जातीचा हा साप असून, पुनर्वसु फाउंडेशनचे सर्पमित्र अष्टविनायक मोरे यांनी ही कामगिरी केली आहे.
खारघर सेक्टर ६ येथे शुक्रवारी (ता. १३) एका दक्ष नागरिकांने पुनर्वसु फाउंडेशनला फोनद्वारे एक साप केमिकलमध्ये अडकल्याची माहिती दिली होती. ही माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र अष्टविनायक मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. एक साप चिकट केमिकलमध्ये सुटण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून आले. फाउंडेशनचे संस्थापक प्रीतम भुसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरे यांनी खोबरेल तेलाचा वापर करून अत्यंत कौशल्याने त्या सापाची सुखरूप सुटका केली. केमिकलमुळे सापाची त्वचा पुन्हा चिकटू नये यासाठी बरणीला तेल लावून त्यास सुरक्षित ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी मोरे यांनी प्रीतम भुसाणे, माधव गायकवाड आणि इतर सदस्यांच्या मदतीने सापाच्या अंगावरील केमिकल काळजीपूर्वक काढून स्वच्छ केले. त्याला जवळील जंगलात सोडण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील कामगार व नागरिकांनी सर्पमित्र अष्टविनायक मोरे आणि पुनर्वसु फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

