हलक्या पावसाची शक्यता

हलक्या पावसाची शक्यता

Published on

वाणगाव (बातमीदार) : मुंबई प्रादेशिक हवामान विभागाद्वारे देण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस अंशत: ढगाळ वातावरण राहील. तसेच तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात (एक ते दोन मिमी) पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कमाल तापमानात वाढ होऊन ३३ ते ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील पाच दिवस आर्द्रतेत वाढ होऊन सकाळची आर्द्रता ९२ ते ९८ टक्के आणि दुपारची आर्द्रता ४९ ते ६१ टक्के राहील. पिकांची काढणी पावसाची शक्यता असल्याने तयार झालेल्या भाजीपाला व फळांची काढणी करून घ्यावी. आंबा बागेत फळे गळाली, तर ती वेचून शेताबाहेर विल्हेवाट लावावी. पावसाची शक्यता असल्याने जनावरांचा चारा सुरक्षित ठिकाणी ठेवावी, अशी माहिती पालघर जिल्हा कृषी हवामान केंद्रामार्फत देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com