लोकलखाली प्रवासी आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित
चिंचपोकळी-भायखळादरम्यान लोकलखाली प्रवासी आल्याने विलंब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी-भायखळा स्थानकादरम्यान बदलापूर सीएसएमटी जलद लोकलखाली एक प्रवासी आल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. १७) दुपारी ३.४८ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळित झाली. परिणामी, सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल गाड्या एकामागोमाग खोळंबल्या आणि प्रवाशांना मोठा विलंब सहन करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) तसेच लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक कार्यवाही करून त्यांनी लोकलखाली अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढले. त्यानंतर दुपारी ४.१२ वाजता लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. या अपघातात संबंधित प्रवाशाचा मृत्यू झाला. त्याची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेचा परिणाम मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठ्या प्रमाणात झाला. सीएसएमटीकडे जाणाऱ्या रखडलेल्या जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या. त्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल सेवांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. परिणामी, अनेक लोकल उशिराने धावल्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

