गॅस सिलेंडर तुम्ही द्या, जेवण आम्ही बनवतो!

गॅस सिलेंडर तुम्ही द्या, जेवण आम्ही बनवतो!

Published on

सिलिंडर तुमचे, जेवण आमचे!
गॅसटंचाईवर उल्हासनगरच्या केटरर्सची नवी शक्कल

उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे संकटात सापडलेल्या केटरिंग व्यवसायाने आता एक आगळावेगळा मार्ग शोधला आहे. तुम्ही सिलिंडरची सोय करा, आम्ही जेवण बनवून देतो, असा नवा ‘सिलिंडर प्लॅन’ येथील केटरर्सनी सुरू केला असून, यामुळे रखडलेल्या ऑर्डर्सना पुन्हा गती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक एलपीजी गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने लग्नसमारंभ, वाढदिवस आणि इतर घरगुती कार्यक्रमांच्या जेवणाचे नियोजन कोलमडले होते. यावर उपाय म्हणून केटरर्सनी ग्राहकांसमोर एक अट ठेवली आहे.
आयोजकानेच गॅस सिलिंडरची व्यवस्था करायची आहे तर स्वयंपाकाची जबाबदारी केटरर्सची असेल. केटरर्स आपले मनुष्यबळ आणि साहित्य वापरून जेवण तयार करून देतील. या नव्या पद्धतीमुळे दोन्ही बाजूंचा फायदा होत असल्याचे चित्र आहे. यामुळे ऑर्डर रद्द कराव्या लागत नसल्याने केटरर्सचे होणारे नुकसान थांबले आहे.

नियोजन सोपे
घरगुती सिलिंडरचा वापर करून (पर्यायी सोय म्हणून) कार्यक्रम वेळेत पार पाडणे आयोजकांना शक्य होत आहे. तसेच गॅसच्या प्रतीक्षेत कार्यक्रम लांबणीवर टाकण्याची वेळ आता टळली आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत नसल्याने हा तात्पुरता मार्ग निवडला आहे; मात्र शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुरवठा नियमित करावा, अन्यथा दीर्घकाळ हा व्यवसाय टिकवणे कठीण होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक केटरिंग व्यावसायिकांमध्ये उमटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com