

पीएम किसान लाभार्थ्यांसाठी शिबिर
बोर्डी (बातमीदार) ः तलासरी तालुक्यातील पीएम किसान लाभार्थ्यांचे येणारे पैसे बंद झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी कृषी व महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार कार्यालय तलासरी येथे मंगळवार (ता. २४) विशेष शिबिर होणार आहे. ज्या लाभार्थ्यांचे पैसे बंद झालेले आहे, अशा लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय येथे उपस्थित राहून लाभ पूर्ववत सुरू करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.