इंधनासाठी गुजरातच्या सीमेवर

इंधनासाठी गुजरातच्या सीमेवर

Published on

इंधनासाठी गुजरातच्या सीमेवर
डहाणूतील रिक्षा, वाहनचालकांची धावाधाव

बोर्डी, ता. २१ (बातमीदार) ः डहाणूमध्ये सीएनजी पंप उपलब्ध नसल्यामुळे तसेच महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यात पेट्रोलचे दर कमी असल्यामुळे डहाणू परिसरातील अनेक रिक्षा, वाहनचालक पेट्रोल, सीएनजी इंधन भरण्यासाठी गुजरात राज्याच्या सीमेवर धाव घेत आहेत.
डहाणू शहरात १,२०० रिक्षा असून त्यापैकी ७०० रिक्षा सीएनजी गॅसवर चालणाऱ्या आहेत; परंतु डहाणू परिसरात सीएनजी पंप नसल्याने चालकांना बोईसर किंवा चारोटी असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक रिक्षाचालक गुजरात राज्यातील सीमेवरील देहरीतील पेट्रोल पंपावर जात आहेत. एकीकडे महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे डहाणूतील चालकांना इंधनासाठी परराज्यात जावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com