एरोप्लेन बासमती राईसचा आयपीओ लवकरच बाजारात

एरोप्लेन बासमती राईसचा आयपीओ लवकरच बाजारात

Published on

एरोप्लेन बासमती राईसचा आयपीओ लवकरच बाजारात

मुंबई, ता. २२ : एरोप्लेन बासमती राईसचे निर्माते आणि निर्यातदार अमीरचंद जगदीशकुमार (एक्सपोर्ट) कंपनीचा आयपीओ २४ ते २७ मार्च दरम्यान बाजारात येणार आहे.
या आयपीओसाठी २०१ ते २१२ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. ४४० कोटी रुपयांच्या आयपीओमधील बहुतांश रक्कम त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी आणि कंपनीच्या इतर उद्दिष्टांसाठी वापरली जाईल. या आयपीओमधील ५० टक्के शेअर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना, १५ टक्के शेअर बिगर संस्थात्मक मोठ्या गुंतवणूकदारांना, तर ३५ टक्के शेअर सामान्य गुंतवणूकदारांना दिले जाणार आहेत. मागील वर्षी कंपनीचा महसूल एक हजार २१ कोटी रुपये आणि निव्वळ नफा ४८ कोटी रुपये होता. तर आर्थिक वर्ष २०२५मध्ये त्यांचा महसूल दोन हजार कोटी रुपये, तर निव्वळ नफा ६० कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२३मध्ये त्यांचा महसूल एक हजार ३१५ कोटी रुपये, तर निव्वळ नफा १७ कोटी रुपये होता.
बासमती तांदूळ तसेच स्वयंपाकघरातील अन्य वस्तूंची निर्मिती आणि निर्यात कंपनीतर्फे केली जाते. या क्षेत्रातील सर्व कंपन्यांमध्ये त्यांचा महसूल तिसऱ्या क्रमांकावर आहे. बासमती तांदळाखेरीज गव्हाचे पीठ, मैदा, डाळीचे पीठ, मीठ, साखर यांची विक्रीदेखील कंपनीतर्फे केली जाते. एरोप्लेन तसेच अलिबाबा, वर्ल्डकप, जेट या ब्रँड नावाने या वस्तूंची विक्री होत आहे. त्यांच्याकडे १०० ट्रेडमार्क असून, २२ कॉपीराईट आहेत. ३८ देशांत त्यांची उत्पादने निर्यात होतात. कोलम राईस, सोना मसुरी, इडली राईस हे तांदळाचे प्रकारदेखील ते विक्री करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com