आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

Published on

आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
सूर्या नदीत उडी मारणाऱ्या महिलेला युवकाने वाचवले

मनोर, ता. २३ (बातमीदार) ः पालघर तालुक्यातील मासवण गावाच्या हद्दीतील सूर्या नदी पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला एका युवकाने वाचवले आहे. आजारपणाला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
सूर्या नदी पुलावरून पाण्यात उडी मारणाऱ्या मनोर गावातील कृपावती यादव यांना मासवण गावातील कार्तिका उघडे यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ आरडाओरडा करून मदतीसाठी हाक दिली. त्यांच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक सतर्क झाले. याच वेळी वसई-विरार पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग स्टेशनवर कार्यरत असलेले मासवण ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य समीर पवार यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत नदीपात्रात उडी मारली. बुडणाऱ्या महिलेला शोधून तिला सुरक्षितपणे काठावर आणले. घटनेची माहिती मिळताच मासवण गावचे पोलिस पाटील अमर भोईर दाखल झाले. त्यांनी संबंधित महिलेची चौकशी केली असता महिला मनोर गावातील रहिवासी असल्याचे समोर आले. आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली तिने दिली. दरम्यान, महिलेची प्रकृती स्थिर असून मनोर-पालघर मार्गावरील चहाडे नाका येथील तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेनंतर समीर पवार यांच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com