‘एच पश्चिम’ विभागातील पाणीपुरवठा रविवारी राहणार बंद
‘एच पश्चिम’ विभागातील पाणीपुरवठा रविवारी राहणार बंद
मुंबई, ता. २३ : वांद्रे पाली हिल जलाशयाच्या पाणी पातळीत सुधारणा करण्यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नाईक मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग आणि आर. के. पाटकर मार्ग जंक्शन या दरम्यान ७५० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्याने टाकण्यात आली आहे. ही नवीन मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम येत्या शनिवारी (ता. २८) रात्री ११ वाजेपासून ते रविवारी (ता. २९) सायंकाळी ५ वाजेदरम्यान एकूण १६ तास चालणार आहे. यादरम्यान ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार आहे. तसेच काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील चार ते पाच दिवस पाणी उकळून, गाळून प्यावे तसेच महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
या भागांत पाणीपुरवठा बंद
संपूर्ण खार पश्चिम, सांताक्रूझ पश्चिम व वांद्रे पश्चिम येथील काही भाग, बाजार मार्ग, जैन मंदिर मार्ग परिसर, डि’मोंटे रस्ता परिसर, वांद्रे पश्चिमेकडील हिल रोड, पेरी रोड, मॅन्युअल गोन्साल्विस रोड, सेंट अँड्र्यूज रोड, सेंट पॉल रोड, डॉमनिक रोड, आर. के. पाटकर रस्ता, न्यू आणि ओल्ड कांतवाडी, रणवार गाव, वरोडा मार्ग, कार्टर रोड, पालीमाला मार्ग, चिंबई गाव, शेर्ली गाव, राजनगाव, मालागाव आणि पालीगाव परिसरातील भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गझदरबंद झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेकडील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

