आर्यन खान अटक प्रकरण :

आर्यन खान अटक प्रकरण :

Published on

आर्यन खान अटक प्रकरण 
---
शाहरुख खानकडे कधीच
लाच मागितली नाही!
समीर वानखेडेंचा उच्च न्यायालयात दावा

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २३ : आर्यन खानच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरुख खानशी कोणताही संपर्क साधला नाही, त्याच्याकडे लाचेची मागणी केली नाही आणि घेतलीही नाही, असा दावा केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी सोमवारी (ता. २३) उच्च न्यायालयात केला. 
कॉर्डिलिया क्रूझप्रकरणी शाहरुखकडे लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायालयानेही याचिकेची दखल घेऊन सीबीआयच्या तपासावर नाराजी व्यक्त केली होती.  तपास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अजून किती दिवस लागतील, असा प्रश्न केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी वानखेडे यांच्या वतीने वरिष्ठ वकील अंबाद पोंडा यांनी लाच घेतल्याच्या आरोपांचे खंडन केले.
एनसीबी विभागीय संचालक असताना समीर वानखेडे यांनी बॉलीवूडमधील अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उडकीस आणले होते. त्या वेळी अनेकांकडे अमली पदार्थही सापडले होते. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवरील छाप्यात आर्यन खानला अटक केल्याने आपल्याला खोट्या आरोपात गोवण्यात आले होते. आर्यनला वाचवण्यासाठी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आणि त्यातील ५० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारल्याचा आरोप आपल्यावर करण्यात आला; परंतु आपण शाहरुख खानशी कोणताही संपर्क साधला नाही, असा दावा वानखेडे यांच्या वतीने पौंडा यांनी केला.  त्याच वेळी सीबीआयकडून वकील अनुपस्थित असल्याने न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (ता. २४) ठेवली.
----
कोणत्याही चौकशीला तयार!
आपल्याला एका राजकीय व्यक्तीकडून सतत लक्ष्य करण्यात आले. आजपर्यंतच्या कारकिर्दीत आपण कधीही चुकीचे वागलो नाही. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून आपण कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार आहोत, असा दावा वानखेडे यांनी केला. आपल्या कुटुंबीयांवरही सतत आरोप केले गेले. आपली काही खासगी छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे सारे आरोप खोटे, दिशाभूल करणारे असून तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्यासाठी आरोप केल्याचेही एनसीबीने प्रतिज्ञापत्रात म्हटल्याकडे वानखेडेंनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com