जिल्हा सहकारी बँक निवडणुकीचे वारे वेगाने

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीचे वारे वेगाने
Published on

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. २५ : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-२०३१ या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इच्छुकांनी गावागावांत हालचाली तीव्र केल्या आहेत. शहापूर तालुक्यातील ६८ गावांतील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव गोळा करण्यासाठी सध्या मोठी लगबग सुरू आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या या बँकेवर प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. त्यासाठी गावपातळीवर शह-काटशहाचे राजकारण रंगताना दिसत आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (कोकण विभाग, नवी मुंबई) यांनी २६ फेब्रुवारीला जाहिरनामा जारी करून जिल्ह्यातील सर्व सभासद संस्थांकडून प्रतिनिधी निवडीचे ठराव मागवले आहेत. या प्रक्रियेअंतर्गत तालुक्यातील सहकारी संस्थांचे ठराव स्वीकारण्याचे अधिकार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शहापूर यांना देण्यात आले आहेत. संबंधित संस्थांनी संचालक मंडळाच्या बैठकीत प्रतिनिधी निश्चित करून त्यांचे ठराव व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये प्रतिनिधी ठरावासोबत प्रमाणपत्राच्या चार प्रती, बैठकीचे इतिवृत्त, नोटीस आणि उपस्थित संचालकांचा हजेरीपट यांच्या प्रत्येकी चार प्रती सादर कराव्या लागणार आहेत.
सर्व कागदपत्रे ६ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत कार्यालयीन वेळेत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शहापूर यांच्या कार्यालयात जमा करावीत, असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये प्रतिनिधी पदासाठी इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या असून, ठरावावर आपले नाव निश्चित व्हावे यासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.

थकीत संस्था मतदानास अपात्र
कृषी पतपुरवठा सहकारी संस्था वगळता इतर सभासद संस्था थकीत असल्यास त्या मतदानाला पात्र असणार नाहीत. निवडणूक नियमांचे कलम १० (४) नुसार एकदा पाठवलेल्या प्रतिनिधीचा ठराव बदलता येणार नाही; परंतु प्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास अथवा नवीन संचालक मंडळ गठीत झाल्यासच ठरावात बदल करून प्रतिनिधीचे नाव सुचवता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com