

बेलापूर रेल्वे स्थानकातील रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबईतील महत्त्वाचे दळणवळणाचे केंद्र असलेल्या बेलापूर रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. अखेर पालिका प्रशासनाने डागडुजीचे काम सुरू केले मात्र, ही केवळ तात्पुरती मलमपट्टी केल्याचे दिसून येत आहे.
बेलापूर स्थानकातून दिवसभरात हजारो प्रवासी ये-जा करतात. यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेक महिन्यांपासून स्थानिक रिक्षा चालक संस्थेने सिडको प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. यानंतर कामाला सुरुवात झाली खरी परंतु हे कामही तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे. स्थानक परिसरात डांबरीकरणाऐवजी पेव्हर ब्लॉक बसवले असून काम अर्धवट केले आहे. परिणामी, रस्ते उखडलेले, असमतोल आणि अधिक धोकादायक बनले आहेत. त्यामुळे अपघाताची भीती वाढली असून दररोज हजारो प्रवासी आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
डांबरीकरणाची मागणी
नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतरही दर्जेदार आणि सुरक्षित काम न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ याची गंभीर दखल घेऊन योग्य दर्जाचे आणि कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, अशी मागणी एकविरा रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सिडको जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाहीं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.