

येऊरमध्ये शिकारीचा थरार
माकडांना सलग दोन दिवस बाण मारण्याच्या घटना
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) ः येऊर परिसरात गेल्या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या माकडांना स्टीलच्या बाणाने लक्ष्य करण्यात आले. या कृत्यामुळे पर्यावरण आणि प्राणीप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वनविभागाने गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
ठाण्यातील येऊर परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येतो. येथे नागरी वसाहती असल्यामुळे वन्यप्राणी अन्न पाण्याकरिता मानवी वसाहती जवळ येत असतात. आदिवासी वसाहतींसोबतच येथे व्यावसायिक हॉटेल्स, फार्म हाऊस, टर्फ, बंगले नसल्यामुळे वन्य प्राण्यांच्या धोका निर्माण होत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांची लपून शिकार करण्याचे प्रकार घडत आहेत. शुक्रवारी येथील जंगलामध्ये एका झाडावर स्टीलचा बाण लागलेल्या अवस्थेत जखमी माकड आढळून आले असतानाच दुसऱ्या दिवशी देखील दुसऱ्या माकडाच्या महिन्यातून बाण आरपार झाल्याची घटना समोर आली. दोन्ही माकडांना मारण्यात आलेले बाण धनुर्विद्या उपकरणांचा वापर करून नेमबाजाने चालवल्याचा अंदाज आहे. या घटनांवर परिसरामध्ये शिकारीचे प्रकार वाढले असण्याची शक्यता असून प्राणीमित्रांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
माहिती देणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस जाहीर
माकडांना बाण मारल्याच्या घटना घडल्याने वन विभाग देखील सक्रिय झाला असून बाण मारणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल असे देखील वन विभागाने कळविले आहे. वनक्षेत्रपाल संतोष डगळे आणि वनपाल सी. जे. खांडवी यांना नागरिकांनी तत्काळ संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे एक अमानुष कृत्य आहे. वन व्यवस्थापन समितीच्या संरक्षित जंगलांतील वन्यजीवांवर झालेला हा थेट हल्ला आहे. ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्याला शोधून दंडित करणारच, इतकेच नाही तर समितीतील सर्व भागधारक, वन विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलिस, स्थानिकांच्या सहकार्याने येथील सर्व बेकायदेशीर आस्थापनाना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
- रोहित जोशी, कार्यकारी सदस्य, वन व्यवस्थापन समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.