युद्धाच्या नावाखाली लूटमार

युद्धाच्या नावाखाली लूटमार
Published on

युद्धाच्या नावाखाली लूटमार
बोईसरमधील खासगी पंपावर पेट्रोल-डिझेलची दरवाढ

बोईसर, ता. २६ (वार्ताहर) : परिसरातील एका खासगी पेट्रोल पंपावर पेट्रोल पाच रुपये तर डिझेलमध्ये तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शहरातील इतर पेट्रोल पंपांवर जुनेच दर कायम असल्याने युद्धाच्या नावाखाली लूटमार सुरू असल्याची भावना जनमानसात झाली आहे.
पंपावर पेट्रोलचा दर १०४.७८ रुपयांवरून थेट १०९.७८ रुपयांवर करण्यात आला आहे. तर डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीने वाहनधारकांमध्ये संभ्रम असून पेट्रोल पंप चालकाच्या मनमानीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, दरवाढीच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर काही नागरिकांकडून इंधनाचा साठा केला जात आहे. या प्रकारामुळे दरवाढीचा अधिकृत आदेश आहे का, असा सवाल उपस्थित होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच शहरात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले.
------------------------
आमच्या एजन्सीकडून पेट्रोलचे दर वाढल्याचा मेल आला आहे. त्यामुळे त्याप्रमाणे इंधनाची विक्री सुरू केली आहे.
- प्रकाश शहा, मायरा पेट्रोल पंप, चित्रालय बोईसर
---------------------------------
काल पेट्रोल १०४.७८ विकले जात होते. आज १०९.७८ रुपये आहे. ही आमची फसवणूक असून पेट्रोल पंप चालकांची मनमानी सुरू आहे.
- समशेर रहीम, ग्राहक
--------------------------
या प्रकाराची चौकशी करण्यात येईल. तसेच काही चुकीचे आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
- तानाजी शिंदे, पुरवठा अधिकारी
---------------------------
पेट्रोल, डिझेलमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. तसेच साठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
- नरेंद्र रामटेके, व्यवस्थापक, इंद्रप्रस्थ पेट्रोल पंप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com