वाढवण ग्रीनफिल्ड महामार्गच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्त

वाढवण ग्रीनफिल्ड महामार्गच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्त
Published on

वाढवण महामार्गासाठी
कंत्राटदार नियुक्त

पालघर, ता. ३० ः वाढवण बंदराशी संलग्न असलेल्या तवा वाढवण ग्रीनफिल्ड महामार्गासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट-शिंदे डेव्हलपर्स यांच्या संयुक्त कंपनीला हे महामार्गाचे काम नुकतेच मिळाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या महामार्गाच्या अंमलबजावणीचे काम पाहत आहे.
तवा वाढवण हा ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग जवळपास ३२ किमी लांबीचा आहे. वाढवणपासून तो थेट तवा येथे जोडण्यात येणार आहे. या महामार्गामुळे हे अंतर केवळ ३० मिनिटांत पार करता येणार आहे. अलीकडेच प्रशासनाकडून महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. हा महामार्ग उभारण्यासाठी प्राधिकरणाने निविदाकारांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये सुमारे आठ निविदाकारांनी सहभाग घेतला. त्यात जे कुमार इन्फ्रा-शिंदे डेव्हलपर्स या कंपनीने दोन हजार ३६० कोटींची सर्वात कमी बोली लावली. त्यामुळे निविदा अंतिम होऊन हे काम व त्याचे आदेश लवकरच इतर प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला देण्यात येणार आहेत. अडीच वर्षात हा महामार्ग सेवेत आणण्याचा मानस प्राधिकरणाचा आहे.

चिंचारे गावाजवळ आंतरबदल
तवा या गावापासून प्रस्तावित महामार्ग सुरू होणार असून, तो वाढवण बंदरापर्यंत जाणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या परीसरात लॉजिस्टिक पार्क, कार्गो हब, एसईझेड, कंटेनर पार्किंग विकसित करण्याची योजना आहे. भूसंपादन आणि महामार्ग उभारणीसाठी अंदाजे २८८१ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मुंबई दिल्ली एक्स्प्रेसवेच्या चिंचारे गावाजवळ आंतरबदल मार्ग (इंटरचेंज) असणार आहे. तर या महामार्गासाठी सूर्या नदीवर मोठा पूल बांधण्यात येणार आहे.

जमीन मार्गासाठी अधिग्रहित गावे
डहाणू तालुक्यातील वरोर, वासगाव, चिंचणी, तणाशी, बावडा, कोलवली, वाणगाव, साये, उर्से, पेठ, धामटणे, कोल्हाण, घोळ, तवा तर पालघर तालुक्यातील नेवाळे, राणीशिगाव, हनुमान नगर, शिगाव,सुमडी, खुताड, बोईसर, गारगाव, रावते, चिंचारे, आकेगव्हाण, आकोली, नानिवली, आंबेदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com