यीन अधिवेशन प्रतिक्रिया

यीन अधिवेशन प्रतिक्रिया
Published on

यीन अधिवेशन प्रतिक्रिया
-----
‘यिन’ अधिवेशनात सहभागी होण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. युवकांसाठी, समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा यातून मिळत आहे. जिल्हा स्तरावरून राज्य स्तरापर्यंत नेतृत्व करण्याची संधी ‘यिन’ने मिळवून दिली. याबद्दल ‘सकाळ यिन’चे मनःपूर्वक आभार.
-ओमकार स्वामी, सोलापूर
------
‘यिन मिनिस्ट्री’ अधिवेशनाचा अनुभव खूप चांगला आहे. भंडारा जिल्ह्यातून माझी निवड झाली, याचा खूप आनंद आहे. ‘यिन’ मिनिस्ट्रीच्या माध्यमातून तरुणांसाठी काम करता येईल, ही विशेष आनंदाची गोष्ट आहे.
-निलीमा पारधी, भंडारा
------
‘यिन’ अधिवेशनात खूप शिकायला मिळाले. राज्यस्तरीय उपक्रमाचा पहिलाच अनुभव आहे. यातून युवकांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल. ‘यिन’ची चळवळ अधिक सक्रिय करण्याचा मानस आहे. ‘यिन’च्या विविध उपक्रमांमध्ये आमच्या महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग असेल.
-ओम शिंगे, कोल्हापूर
------
‘यिन’ मिनिस्ट्रीच्या माध्यमातून संसदीय कामकाजाची माहिती मिळाली. सभागृहाची शिस्त, सभागृहात मांडण्यात येणारे ठराव, लोक कल्याणासाठी सभागृहात होणारी चर्चा याबाबत अधिक माहिती मिळाली. भविष्यात याचा नक्कीच उपयोग होईल. ही संधी दिल्याबद्दल खूप-खूप आभार.
-राज कडू, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com