

२२ ज्येष्ठ नागरिकांना लाभले ''दृष्टीदान''
यंगिस्तान फाउंडेशनचा पुढाकार
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीसह विविध राज्यांत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ''यंगिस्तान फाउंडेशन''ने पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श जपला आहे. संस्थेच्या वतीने बंगळूर येथील २२ ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा एकदा जग पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
बंगळूर येथील अनेकल परिसरातील सिपानी सेवा सदन वृद्धाश्रमात ऑगस्ट २०२५ मध्ये संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. त्याच वेळी घेण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरात २२ वृद्धांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले होते. या सर्वांच्या २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.
रुग्णांना दर्जेदार आणि स्पष्ट दृष्टी मिळावी, यासाठी या शस्त्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीचे ''आयातीत लेन्स'') बसवण्यात आले आहेत. केवळ उपचार करून न थांबता, पुढील एक महिनाभर या सर्व रुग्णांची नियमित आरोग्य तपासणी आणि काळजी संस्थेमार्फत घेतली जाणार आहे. संस्थेचे उद्दिष्ट केवळ उपक्रम राबवणे नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवणे हे आहे. वृद्धांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्या कार्याचे यश आहे, असे यंगिस्तान फाउंडेशनचे संस्थापक मिथिलेश झा यांनी म्हटले.
सहकार्य आणि सहभाग
यंगिस्तान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिथिलेश झा आणि उपाध्यक्ष रोशन झा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. एव्हीआय एसपीएल इंडिया यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या कार्यास आर्थिक सहकार्य लाभले. या मोहिमेत दिव्याश्री पोलिमेरा, मन्नू झा, शैला अय्यंगार, अभिषेक सिंह, सुजाता झा आणि टीम ''मेरे हिस्से की खुशी''च्या स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.