सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी
Published on

सलग दुसऱ्या दिवशी कोंडीविघ्न
मुंबई-गुजरात वाहिनीवर वाहनांच्या रांगा
मनोर, ता. ३१ (बातमीदार) : वरई येथील वांद्री नदीवरील पुलाच्या दुरुस्तीमुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही वाहिन्यांवर आठ ते दहा किलोमीटरच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते. यामुळे अनेकांनी विरुद्ध दिशेने प्रवास केल्याने कोंडीत भर पडली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील वांद्री नदीवरील गुजरात वाहिनीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम रविवारी रात्री सुरू केले आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी मुंबई वाहिनीवरील अवजड वाहतूक गुजरात वाहिनीवर वळविण्यात आली आहे. मुंबई वाहिनीच्या दिशेने एक मार्गिका उपलब्ध असल्यामुळे पुलालगच्या जुन्या पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. पण अवजड वाहनांमुळे हलकी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत.
वाहतूक कोंडी सोडवण्यात महामार्ग पोलिसांना अपयश आल्याने आठ ते दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने वाहनचालकांची गैरसोय झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
---------------------------
प्रवाशांची गैरसोय
वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांकडे मोर्चा वळवला होता. मुंबई वाहिनीवर कुडे गावापर्यंत वाहनांच्या रांगा कायम होत्या. सायंकाळी चारच्या सुमारास गुजरात वाहिनीवरील वाहतूक कोंडी सोडवण्यात वाहतूक पोलिसांना यश आले. पण दुरुस्तीच्या कामादरम्यान नियोजनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्णांची गैरसोय होत आहे.
------------------
पोलिसांची दमछाक
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दिवसा पाच आणि रात्री १० ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलिसांना १० अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ३० वाहतूक पोलिस, १५ ट्रॅफिक वार्डन समन्वय साधून वाहतूक कोंडी सोडवण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षण पवन ठाकूर यांनी दिली.
----------------------------------
ऐंशीच्या दशकातील पूल
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वरई येथील वांद्री नदीवर सद्य:स्थितीत दोन पूल आहेत. ऐंशीच्या दशकात उभारलेला दगडी पिलर असलेला पूल जीर्ण झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी दगडी पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी केल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्याची आवश्यकता असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम सुरू केल्याने कोंडी निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com