

नुकसानभरपाईचा वेग मंदावला
बोर्डी, ता. ३ (बातमीदार) : खरीप हंगामातील नुकसानभरपाई वाटपासंदर्भात शासनाकडून पुन्हा एकदा हालचालींचा वेग मंदावल्यामुळे शेतकरी, बागायतदार हे हवालदील झाले आहेत. या प्रक्रियेमध्ये शेतकरी व बागायतदारांना पूर्णपणे अंधारात ठेवले जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाने शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचा घाट घातला आहे का, असा आरोप शेतकरी करू लागले आहेत.
२०२४ मध्ये खरीप हंगामात अतिवृष्टी, वादळी वारे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध समस्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय झाला होता. संबंधित नुकसानभरपाई ऑक्टोबर २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होती. त्यानुसार झालेल्या सर्व्हेप्रमाणे शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करून ई-केवायसी करण्यासाठी सूचना दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले होते; परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा होण्यास विलंब होत होता. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्तर मिळत नसल्यामुळे सरासरी तालुकास्तरावर पालघर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांनी आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये हा विषय हाताळला गेल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा ई-केवायसी करून घ्यावी, अशा सूचना दिल्या गेल्या. यानंतर शासनदरबारी नुकसानभरपाई वाटपाच्या कामात वेग येईल, अशी आशा निर्माण झाली होती, मात्र नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरही शेतकरी मात्र उपेक्षितच राहिल्यामुळे भरपाईचा वेग मंदावल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.