सीवूड्समध्ये सोमवारी नवरंग संत साहित्य संमेलन

सीवूड्समध्ये सोमवारी नवरंग संत साहित्य संमेलन
Published on

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : संत साहित्याचा प्रचार-प्रसार आणि त्यातील जीवनमूल्यांचा जागर करण्याच्या उद्देशाने नवरंग मंडळाच्या वतीने नवरंग संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन सोमवारी (ता. ६) सकाळी ९.३० वाजता सीवूड्स पश्चिमेतील सेक्टर ४८ मधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पार पडणार आहे. या संमेलनात संत साहित्य क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक, विद्वान आणि अनुभवी वक्ते सहभागी होणार असून संतांच्या वाङ्मयातील गूढार्थांचा सखोल उलगडा करण्यात येणार आहे.

संत साहित्य अभ्यासकांच्या मांदियाळीत संत-सज्जनांच्या विचारांचे ओजस्वी मंथन होणार असून अध्यात्म आणि समाजकारण यांचा समतोल मेळ या संमेलनातून अधोरेखित केला जाणार आहे. भक्ती, ज्ञान, कर्मयोग आणि संस्कार यांचा समन्वय साधणारे विचार या माध्यमातून उपस्थितांना अनुभवता येणार आहेत. आधुनिक धावपळीच्या जीवनशैलीत संत साहित्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या ज्ञानयज्ञात जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नवरंग मंडळाचे कार्यवाह घनश्याम परकाळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com