९५० एन एच एम कर्मचारी दोन महिने पगाराविना

९५० एन एच एम कर्मचारी दोन महिने पगाराविना
Published on

९५० कुटुंबांवर आर्थिक संकट
एनएचएम कर्मचारी दोन महिने पगाराविना
जव्हार, ता. ६ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यात आरोग्यसेवा देणाऱ्या एनएचएम कर्मचारी दोन महिने पगाराविना आहेत. त्यामुळे ९५० कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून, दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील शहरी तसेच दुर्गम भागांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रशासनाला विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे विविध भागांमध्ये एनएचएम कर्मचारी नियुक्त आहेत. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका, सर्वेक्षण कर्मचारी अशा विविध पदांवरील कर्मचारी जिल्हाभरातील नागरिकांना नियमित आरोग्यसेवा देत आहेत. मात्र, मेहनतीच्या मोबदल्यात मिळणारे वेतन वेळेवर मिळत नसल्याचे वास्तव आहे. दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे किराणा, वीज देयके, घरभाडे सारख्या मूलभूत गरजांबरोबर मुलांच्या शाळांचे शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने चिंतेत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी बँकांकडून, खासगी उसनवारी करत कर्ज घेऊन घरे उभी केली आहेत. मात्र, वेळेवर हप्ते भरता येत नसल्याने जप्तीची भीती त्यांना सतावत आहे.
---------------------------
समायोजन प्रलंबित
आरोग्य कर्मचाऱ्यांनी समायोजनाच्या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने केली. काही महिन्यांपूर्वीच्या राज्यव्यापी आंदोलनानंतर समायोजनाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने समायोजन कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
----------------------------
तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन थकले होते. त्यातील एका महिन्याचे वेतन अलीकडेच जमा झाले. मात्र, दोन महिन्याचा पगार अद्यापही झाला नाही. कर्मचाऱ्यांसमोर अनेक अडचणी उद्भवत आहेत.
- सागर चव्हाण, सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान महासंघ, महाराष्ट्र राज्य
------------------------
एनएचएम कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयास कळवले आहे.
- डॉ. संदीप निंबाळकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com