

श्रीवर्धनकरांना हवी एसटी
आरामदायी बसचा प्रवास ठरतोय त्रासदायक
श्रीवर्धन, ता. ७ (वार्ताहर) ः श्रीवर्धन आगाराकडून लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसाठी साध्या बसेस सोडण्यात येत होत्या. परंतु, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात वातानुकूलित शिवशाही आणि शयनयान बस दाखल झाल्यानंतर श्रीवर्धन आगाराकडून या आरामदायी बसेस सुरू करण्यात आल्या. परंतु, प्रवासी वर्गाला आरामदायी बसच त्रासदायक वाटत असून संबंधित मार्गावर आगाराने पुन्हा साध्या बसेस सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.
आगाराची स्थापना झाल्यानंतर पुणे, मुंबईसह नालासोपारा, भाईंदर, बोरीवली या मार्गावर साध्या बसेस मार्गस्थ करण्यात येत होत्या. कालांतराने श्रीवर्धन आगारात एशियाड बस आणि प्रवासी वर्गाला आकर्षित करतील, अशा शिवशाही व शयनयान बसेस दाखल झाल्या. परिणामी, लांब पल्ल्याच्या मार्गावरील साध्या बसेसचे प्रमाण कमी करण्यात आले. परंतु, आरामदायी बसेसचे तिकीट दर अवास्तव आणि सोयी-सुविधांचा बोजवारा या कारणांमुळे प्रवासी वर्गाकडून आता साध्या बसेसची मागणी करण्यात आली आहे.
शिवशाही बसमधील प्रवास असह्य
वातानुकूलित बस असूनही यंत्रणा व्यवस्थित काम करत नाहीत. यामुळे उकाड्यात प्रवास करणे कठीण जाते. अनेकवेळा वातानुकुलीत यंत्रणा सुरू केल्यावर दुर्गंधी, आसने तुटलेल्या असणे, काचांवरील पडदे अस्वच्छ आणि अनेक आसनाजवळील मोबाईल चार्जिंग पॉईंट्स बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
शयनयान प्रवासी वर्गाला नकोशी
बसमधील येण्या-जाण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रासदायक होते. बर्थवरील आसन आच्छादन, उशांची अस्वच्छता, पंखे दिशाहीन आणि खिडक्यांच्या काचांचा आवाज यातच बर्थमध्ये बसण्यासाठी पुरेशी उंची नसल्याने प्रवाशांना वाकून बसावे लागते.
आम्ही अनेक दिवस लांब पल्ल्यासाठी साध्या बसेस सुरू कराव्यात अशी मागणी करतोय.दुरावस्थेतील शिवशाही व शयनयान बस मधील प्रवास त्रासदायक होतो.प्रवासीवर्गाची दखल श्रीवर्धन आगारप्रमुख घेतील अशी अपेक्षा करतो.
- हरिदास वाघे, नियमित प्रवासी, श्रीवर्धन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.