

मध्यरात्री ऐरोलीत गोळीबार
दुचाकीवरून हल्ला; हल्लेखोर फरार
नवी मुंबई (वार्ताहर) : ऐरोली सेक्टर १ परिसरात सोमवारी (ता. ६) मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याने संपूर्ण नवी मुंबई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, रबाळे पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्ता अमित मौर्य आणि संदीप गवस हे दोघे ऐरोली सेक्टर १ मधील छत्रपती शिवाजी रहिवासी चाळीत उभे असताना सोमवारी (ता. ६) रात्री ११ः५०च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोराने चार राउंड फायर केले. त्यातील एक गोळी अमित मौर्य यांच्या मानेला लागली. त्यामुळे मौर्य हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दुचाकीवरून आलेल्या एका हल्लेखोराने चार राउंड फायर केल्याचे दिसत आहे. पोलिसांनी जखमी अमितची विचारपूस केली असता त्याने अद्याप कोणावरही संशय व्यक्त केला नाही.
ऐरोलीसारख्या गजबजलेल्या भागात मध्यरात्री झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य काही कारणातून, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.