

सिडको १९ हजार घरे बांधणार
अर्थसंकल्पात ६,७७७ कोटींची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : सर्वसामान्यांसाठी नव्या आर्थिक वर्षात सिडको १९ हजार ३०० घरे बांधणार आहे. यासोबत बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे जागतिक वाणिज्य कॉम्प्लेक्सची पायाभरणीदेखील केली जाणार आहे. या सर्व कामांसाठी सिडकोने अर्थसंकल्पात तब्बल ६,७७७ कोटींची तरतूद केली आहे.
सिडकोने आज २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसकल्प मांडला. त्यात १६,२५० कोटींचे उत्पन्न आणि १६,१५० कोटींचा खर्च अपेक्षित असून, १०० कोटींची शिलकी राहणार आहे. सर्वांसाठी हक्काची घरे या शीर्षकाखाली सिडकोने नव्या वर्षातही घरे निर्मितीचा यज्ञ सुरू ठेवला आहे. सध्या सिडकोने निर्माण केलेल्या घरांपैकी २०२५-२६ या आर्थिक वर्षात महामंडळाने १६,८७६ सदनिकांची गृहनिर्माण योजना जाहीर केली होती. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर २०२६-२७मध्ये सुमारे १९,३०० सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना सिडकोकडून राबविण्याचे नियोजन आहे. एकात्मिक पायाभूत सुविधा विकास, शाश्वत शहरी नियोजन आणि नागरिक-केंद्रित विकास यांवर आधारित धोरण कायम ठेवत नवी मुंबईला देशातील सर्वांत प्रगत आणि नियोजित शहरांपैकी एक म्हणून विकसित करण्याचा सिडकोचा प्रयत्न पुढेही सुरू राहणार आहे.
...
मागील वर्षात...
सिडकोने २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना ९,७७४ कोटी २३ लाख रुपयांचे सुधारित उत्पन्न पकडण्यात आले आहे, तर नऊ हजार ७७० कोटी २६ लाखांचा खर्च अपेक्षित धरला आहे. तीन कोटी ९७ लाख शिल्लक राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.