पालघरमध्ये ''इंटेलिजन्स ब्युरो''साठी हक्काची जागा

पालघरमध्ये ''इंटेलिजन्स ब्युरो''साठी हक्काची जागा
Published on

‘इंटेलिजन्स ब्युरो’साठी हक्काची जागा
पालघरमध्ये महसूलमंत्री बावनकुळे यांचा मोठा निर्णय
विरार ता. १० (बातमीदार) ः पालघर जिल्ह्याच्या सुरक्षेच्या आणि प्रशासकीय रचनेच्या दृष्टीने राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘इंटेलिजन्स ब्युरो’च्या पालघर युनिटसाठी वसई तालुक्यात हक्काची जमीन मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्याने आता पालघरमध्ये ‘आयबी’चे स्वतंत्र कार्यालय आणि कर्मचारी निवासस्थाने उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील भुईगाव येथील एकूण क्षेत्रापैकी १२०० चौ. मी. शासकीय जमीन या प्रकल्पासाठी प्रदान करण्यात आली आहे. ही जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने इंटेलिजन्स ब्युरो, मुंबई यांना देण्यात आली असून, यासाठी प्रचलित वार्षिक दरपत्रकानुसार जमिनीची किंमत आकारण्यात आली आहे.
पालघर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने तेथे गुप्तचर विभागाची यंत्रणा अधिक सक्षम असणे आवश्यक होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून जमीन वाटपाच्या प्रक्रियेला गती दिली आणि आज यासंदर्भातील शासन निर्णय देण्यात आला.

शासनाच्या अटी
जमीन देताना शासनाने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार, या जमिनीचा वापर केवळ कार्यालय आणि निवासस्थाने बांधण्यासाठीच करणे बंधनकारक असणार आहे. जर मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर थांबवला, तर ती जमीन महाराष्ट्र शासनास विनामोबदला परत करावी लागेल, असेही अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com