आयआयएम मुंबईत पहिल्यांदाच पदवीचे शिक्षण

आयआयएम मुंबईत पहिल्यांदाच पदवीचे शिक्षण
Published on

आयआयएम मुंबईत पहिल्यांदाच पदवीचे शिक्षण
यंदापासून डिजिटल सायन्स, बिझनेस मॅनेजमेंट पदवीचा अभ्यासक्रम

मुंबई, ता. ११ ः विविध प्रकारच्या व्यवस्थापन पदव्युत्तर आदी अभ्यासक्रम देणाऱ्या मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मुंबईने पहिल्यांदाच आपल्याकडे चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. डिजिटल सायन्स आणि बिझनेस मॅनेजमेंट असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. हा अभ्यासक्रम आयआयटी मुंबई आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांच्या सहकार्याने सुरू केला जाणार असल्याची घोषणा आज संस्थेचे संचालक प्रा. मनोज तिवारी यांनी शनिवारी केली.
या अभ्यासक्रमात प्रामुख्याने अलीकडील काळातील अत्यंत परिवर्तनशील तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि रोबोटिक्स यांना व्यवस्थापनाच्या मुख्य घटकांशी जोडणारा आहे. यातून विद्यार्थ्यांना ऑपरेशन्स, मार्केटिंग, फायनान्स आणि मॅन्युफॅक्चरिंग यांच्याशी संबंधित क्षेत्र खुली करण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी संस्थेच्या पहिल्याच एमबीए बॅचच्या दीक्षांत समारंभात सांगितले.
हा अभ्यासक्रम सुरुवातीला ७० जागा असलेला हा अभ्यासक्रम डिजिटल उद्योगांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नेतृत्व घडवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल, असेही ते म्हणाले. या अभ्यासक्रमाची वार्षिक फी सुमारे सहा ते सात लाख रुपये असेल. हा अभ्यासक्रम आयआयटी मुंबई आणि इतर उद्योग भागीदारांच्या सहकार्याने राबवला जाईल. यात १०० टक्के प्लेसमेंटची हमी असेल. जेईई मेन परीक्षेद्वारे होईल, त्यानंतर मुलाखत घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

तिसऱ्या वर्षात एमबीए
या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांना एमबीए करण्याचा पर्याय दिला जाईल. जो ते चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमानंतर लगेच एका वर्षात पूर्ण करू शकतील, असे सांगत तिवारी यांनी भविष्यात अशा आणखी पदवी अभ्यासक्रम करण्याचा विचारही सुरू आहे; मात्र संस्थेत यासाठी पायाभूत सुविधा वाढवणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या बॅचमधून ५०५ विद्यार्थी पदवीधर
दरम्यान, आयआयएममध्ये आज झालेल्या एमबीए बॅचच्या पहिल्या दीक्षान्त सोहळ्यात एमबीएच्या जनरल एमबीएमधील ३०० विद्यार्थी, एमबीए ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील १७७ विद्यार्थी आणि एमबीए-सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंटमधील २८ विद्यार्थी पदवीधर झाल्याने त्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. तसेच लॉजिस्टिक्स अँड ऑपरेशन्स एक्सलन्स थ्रू डिजिटायझेशन या विषयातील एक वर्षाच्या कार्यकारी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचमधील ३९ विद्यार्थी, एक वर्षाच्या कार्यकारी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील २६ विद्यार्थी आणि डॉक्टरेट पदवीचे सहा विद्यार्थी पदवीधर झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com