आगीतील मृतांना सरकारी मदत देणार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

आगीतील मृतांना सरकारी मदत देणार
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
Published on

आगीतील मृतांना सरकारी मदत देणार
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : भाईंदर पूर्व भागातील इंद्रलोक परिसरात झोपड्यांना शुक्रवारी (ता. १०) भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहाय्य निधीतून मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक यांनी शनिवारी (ता. ११) घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त तहसीलदार नीलेश गौंड उपस्थित होते. घटनेबद्दल हळहळ व्यक्त करतानाच सरनाईक यांनी तिवरांचा नाश करून झोपड्या बांधण्यात आल्याबद्दल तसेच त्यावर प्रशासनाकडून कारवाई झाली नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या झोपड्यांना पाणी, वीज, स्वच्छहातागृहे अशा सुविधा मिळाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. शहरातील सर्व अनधिकृत झोपड्या व शेडवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. इंद्रलोक भागातील या जागेवर भूमाफियांनी तिवरांची कत्तल करून त्यावर झोपड्या बांधल्या.
त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे सरनाईक यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, नवघर पोलिसांनी प्रथमदर्शनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनीदेखील या घटनेची संपूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com