डिजिटल जनगणना प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डिजिटल जनगणना प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

डिजिटल जनगणना प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

वसई ता. १३ (बातमीदार) : डिजिटल जनगणना ठरणाऱ्या जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. तीनदिवसीय विशेष प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचमधील क्षेत्रीय प्रशिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनगणना कशी प्रभावीपणे पार पाडावी याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणात डिजिटल डेटा एन्ट्री, मोबाईल ॲपचा वापर, तसेच सीएमएमएस पोर्टलवरील कामकाज याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. जनगणना कार्यालयातील संजय नाईक, आणि मास्टर ट्रेनर डॉ. महादेव दिनकर इरकर यांनी सादरीकरणाद्वारे घरयादी व घरगणना प्रक्रिया, तसेच प्रगणक व पर्यवेक्षक नियुक्तीबाबत मार्गदर्शन केले. यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन, डेटा अचूकता आणि नागरिकांशी संवाद साधताना घ्यावयाची आवश्यक काळजी यावर विशेष भर देण्यात आला आहे. वसई-विरार महापालिकेच्या जनगणना प्रक्रियेची जबाबदारी आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी पृथ्वीराज बी. पी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आणि उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी हर्षला राणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.

जनगणना २०२७ ही देशाची १६ वी जनगणना असून, ती अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. यामध्ये प्रथमच नागरिकांना स्व:गणना करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा पर्याय १ मे ते १५ मे या कालावधीत उपलब्ध असेल. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रत्यक्ष घरयादी व घरगणना संदर्भात क्षेत्रीय कार्य राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची सविस्तर सामाजिक व आर्थिक माहिती संकलित केली जाणार आहे. पहिल्या बॅचच्या प्रशिक्षणाची सांगता अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या उपस्थितीत झाली.

------------

सर्व क्षेत्रीय प्रशिक्षकांना या राष्ट्रीय कार्यात तत्परतेने आपली सेवा द्यावी व संपूर्ण वसई-विरार शहर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील घरी यादी घरगणनेचे काम अतिशय दर्जेदार व विश्वसनीय करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी केले.
----------
वसई-विरार महापालिकेतील सर्व नागरिकांनी जनगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व प्रामाणिक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
-------------
वसई : जनगणना प्रशिक्षणाला अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी प्रशिक्षणार्थ्यींना प्रोत्साहन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com