शाळांमध्ये आधुनिक सुरक्षित खेळणी बसवली

शाळांमध्ये आधुनिक सुरक्षित खेळणी बसवली
Published on

शाळांमध्ये आधुनिक सुरक्षित खेळणी बसवली
पोस्को महाराष्ट्र स्टीलचा स्तुत्य उपक्रम
माणगाव, ता. १३ (वार्ताहर) : पोस्को कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत माणगाव तालुक्यातील वनवासी कल्याण आश्रमशाळा, माणगाव तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा, भागाड येथे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व सुरक्षित खेळणी बसविण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार खेळ सुविधांचा लाभ मिळावा, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
याअंतर्गत घसरगुंडी, झोपाळा, मंकी बार, सी-सॉ, आदी विविध खेळण्यांची उभारणी करण्यात आली आहे. या खेळण्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक विकास, समन्वय कौशल्ये आणि सामाजिक वर्तन यांचाही विकास होण्यास मदत होणार आहे.
सदर खेळण्यांच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी (ता. ९) उत्साहात पार पडला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ तसेच पोस्को कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. उद्‍घाटनानंतर विद्यार्थ्यांनी नवीन खेळण्यांचा मनसोक्त आनंद घेतला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com