नाल्यालगतची अतिक्रमणे पालिकेसाठी डोकेदुखी

नाल्यालगतची अतिक्रमणे पालिकेसाठी डोकेदुखी
Published on

नाल्यालगतची अतिक्रमणे पालिकेसाठी डोकेदुखी
नाल्यात टाकणारा कचरा रोखणे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः नाल्यालगतची अतिक्रमणे पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. नाल्यालगतच्या झोपड्यांमधून टाकला जाणार कचरा पालिकेला रोखता येत नाही. त्यामुळे हे पालिकेसाठी आव्हान ठरत आहे.
नाल्यात कचरा टाकला जाऊ नये, यासाठी नाला व घरांमध्ये अंतर असलेल्या नाल्याशेजारी सात ते आठ फुटांच्या संरक्षक जाळ्या बसवणे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. नाल्यालगत असलेल्या घराच्या ठिकाणी जाळ्या लावणे शक्य होत नाही. कचरा, डेब्रिज, फ्रीज, कपाट टाकल्याने दरवर्षी नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येते आणि पालिकेला टीकेचा सामना करावा लागतो.
नाल्याशेजारी राहणाऱ्या रहिवाशांकडून कचरा फेकण्यात येत असल्याने नाल्याशेजारी सात ते आठ फुटांपर्यंत जाळ्या लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. यामुळे नाल्याशेजारी राहणाऱ्यांनी कचरा फेकला तरी तो नाल्यात जाणार नाही. यासाठी वांद्रे पश्चिम येथील पी अँड टी कॉलनी नाल्यात कचरा डेब्रिज जाऊ नये, यासाठी नाल्यालगत सात ते आठ फूट उंच जाळ्या बसवण्यात येत आहेत. मुंबईतील अन्य लहान-मोठ्या नाल्यांवर जाळ्या बसवण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
पाणी निचरा होण्याच्या ठिकाणांमध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर पाणी भरल्याचे प्रकार घडतात. नाल्यात मोठ मोठे बेड, सोफे, खाटा, खूची, गाद्या आदी टाकले जातात. शिवाय सर्वाधिक प्रमाणात प्लॅस्टिक आणि कचराही टाकला जातो. त्यामुळे नाल्यालगत जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील नदी, नाले
मुंबईत एकूण नद्या - ५
एकूण छोटे नाले - १,५०८ (लांबी ६०५ किमी)
एकूण मोठे नाले - ३०९ ( लांबी २९० किमी)
रस्त्याखालील ड्रेन - ३,१३४ किमी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com