महानिर्मितीच्या खाणीतून कोळसापुरवठा सुरू

महानिर्मितीच्या खाणीतून कोळसापुरवठा सुरू
Published on

महानिर्मितीच्या खाणीतून कोळसापुरवठा सुरू
कोराडी केंद्रात पहिली खेप दाखल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : राज्यासाठी वीजनिर्मिती करणाऱ्या महानिर्मितीला आता कोळशाचे टेन्शन असणार नाही. महानिर्मितीच्या स्वमालकीच्या छत्तीसगडमधील गरेपालमा-२ या कोळसा खाणीतून कोळसा उत्खनन सुरू झाले असून, त्याची तब्बल चार हजार मेट्रिक टनाची पहिली खेप कोराडी वीज केंद्रात पोहोचली आहे. पुढील खेपही काही दिवसांत येणार असल्याने महानिर्मितीची कोळशाची चणचण संपणार आहे.
महानिर्मितीचे राज्यात १० हजार मेगावाॅटहून अधिक क्षमतेचे औष्णिक वीज प्रकल्प असून, त्याची १० हजार मेगावाॅटहून अधिक स्थापित क्षमता आहे. त्यानुसार हे वीज संच पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी दररोज सुमारे एक लाख मेट्रिक टन कोळसा लागतो; मात्र कोळसा वेगवेगळ्या कंपन्यांकडून घ्यावा लागत असल्याने अनेकदा अपुऱ्या कोळशामुळे पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यावर मर्यादा येतात. त्याची दखल घेत केंद्र सरकारने महानिर्मितीला छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील तमनार तहसीलअंतर्गत येणारी गरेपालमा-२ कोळसा खाण वितरित केली होती. त्यानुसार महानिर्मितीने आवश्यक सर्व परवानग्या घेत ही खाण विकसित केली असून, मार्चमध्ये त्यामधून प्रत्यक्ष कोळसा उत्खनन सुरू झाले असून, मार्चअखेर सुमारे ८० हजार ८९५ मेट्रिक टन कोळसा उत्पादन झाले आहे. त्यापैकी ४,००० मेट्रिक टन कोळसा रेल्वेच्या मदतीने कोराडी वीज केंद्रात रविवारी दाखल झाला आहे. त्यामुळे महानिर्मितीला गरजेनुसार पुरेसा कोळसा आपल्या वेगवेगळ्या वीज केंद्रांकडे वळवणे शक्य होणार असल्याचे महानिर्मितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
...
कोळशाची उपलब्धता
- गरेपालमा कोळसा खाणीत एकूण ६५५ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा साठा
- २३ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा दरवर्षी उपलब्ध होणार
- चंद्रपूर, कोराडी आणि परळी औष्णिक वीज केंद्राला कोळसापुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com