

ठाणे, ता. १३ : वर्तकनगर परिसरातील एका घरकाम करणाऱ्या महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून त्यावर अश्लील मजकूर पोस्ट करत बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार ३२ वर्षीय महिला दोन मुलांसह वास्तव्यास असून घरकाम करून उदरनिर्वाह करतात. १४ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान त्यांना अनोळखी क्रमांकांवरून वारंवार फोन येत होते. संशय आल्याने त्यांनी क्रमांक ब्लॉक केला. मात्र, ६ मार्चला समाज माध्यम वापरत असताना त्यांच्या नावाने बनावट आयडी आढळून आला. या आयडीवर त्यांच्या सहा छायाचित्रांसह मोबाईल क्रमांक टाकून अश्लील व अपमानास्पद मजकूर लिहिला होता. त्यामुळे विविध व्यक्तींकडून त्यांना फोन येऊ लागले. तसेच एका क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल व संदेशाद्वारे शिवीगाळही करण्यात आली. या प्रकारामुळे पीडित महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ठाणे शहर पोलिसांच्या सायबर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.