

सेक्टर-६ मध्ये पुनर्वसन कामांना वेग
धारावी पुनर्विकास प्रकल्प; राहिवाशांना स्थलांतर करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (डीआरपी) माटुंगा रेल्वे मार्गिकेला लागून असलेल्या सेक्टर-६ मध्ये पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू केले जाणार आहे. धारावीकरांना की-टू-की पुनर्वसन घरे दिली जाणार असल्याने त्याकरिता इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी रहिवाशांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आपली घरे रिकामी करावीत, असे आवाहन डीआरपीने केले आहे.
धारावीच्या सेक्टर-६ मध्ये गणेशनगर-मेघवाडी, एसव्हीपी नगर, आजाद नगर अ व ब, आजाद नगर क तसेच कमला रमण नगरचा समावेश आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे. रहिवाशांनी वेळेत सहकार्य केल्यास पुनर्वसन प्रकल्पाचे बांधकाम विना विलंब सुरू होईल. तसेच परिसरातील नागरिकांना होणारी गैरसोय टाळता येईल, असे डीआरपीचे म्हणणे आहे. दरम्यान, स्थलांतर प्रक्रियेसाठी रहिवाशांना तात्पुरत्या निवासस्थानी (ट्रान्झिट अॅकमोडेशन) राहण्याचा किंवा भाड्याच्या घरात स्थलांतर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच स्थलांतरासाठी एकरकमी पाच हजार रुपये अनुदान दिले जाईल. भाड्याने राहण्याचा पर्याय स्वीकारणाऱ्या पात्र रहिवाशांना कायमस्वरूपी घर मिळेपर्यंत दरवर्षी पाच टक्के वाढीसह भाडे अनुदान दिले जाणार आहे.
स्वतंत्र सहाय्य केंद्र स्थापन
रहिवाशांच्या शंका निरसनासाठी व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र सहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रांच्या माध्यमातून रहिवाशांना भाडे धोरण, आवश्यक कागदपत्रे आणि तक्रार निवारणाबाबत माहिती व मदत मिळू शकते. सहाय्य केंद्राचा पत्ता-चौथा मजला, शालीमार इंडस्ट्रियल इस्टेट, टाटा पॉवरजवळ, टी. एच. कटारिया मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, मुंबई - ४०००१९.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.