मुरुड मध्ये बजरंग दला तर्फे भव्य जन आक्रोश मार्चा !

मुरुड मध्ये बजरंग दला तर्फे भव्य जन आक्रोश मार्चा !
Published on

मुरूडमध्ये बजरंग दलातर्फे जनआक्रोश मोर्चा
मुरूड, ता. १५ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यात वाढती गोहत्या आणि गोवंश तस्करी रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे बुधवारी (ता. १५) शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता शेकडो बजरंगी युवक आणि युवतींनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
मुरूड तालुक्यात वाढती बेकायदा गोहत्या आणि गोवंश तस्करी ही चिंतेची आणि संतापजनक बाब आहे. गोहत्येच्या वाढत्या घटनांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बजरंग दल प्रखंड मंत्री महेश घाग, प्रखंड संयोजक अक्षय महाडिक, सहसंयोजक प्रशांत नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मुरूड तालुक्यातील ३२ गावांतून सुमारे ३५० बजरंगी युवा-युवतींनी उपस्थिती दर्शवून गोहत्या करणाऱ्यांना शासन झालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
मुरूड तहसीलदार आदेश डफळ यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठीचे निवेदन या वेळी सादर करण्यात आले. गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यामध्ये सुधारणा करून गुन्हेगारांना जरब बसवली नाही, तर संपूर्ण तालुक्यात तीव्र पडसाद उमटतील याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. मंत्रिमंडळात यावर ठोस निर्णय घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान, मुरूड पोलिस ठाण्यामार्फत आरसीपी व दंगल नियंत्रण पथक व पोलिस पथक मिळून १५० पोलिस व पाच अधिकाऱ्यांनी कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश रसेडे, पोलिस मकरंद पाटील, वाहतूक पोलिस नाईक किशोर बठारे आदींसह पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com