पश्चिमेत पथदिवे सुरू करण्यासाठी स्थानिक पुढाकार यशस्वी

पश्चिमेत पथदिवे सुरू करण्यासाठी स्थानिक पुढाकार यशस्वी
Published on

टिटवाळ्यात पथदिव्यांची दुरुस्ती

टिटवाळा (वार्ताहर) : टिटवाळा पश्चिमेकडील खांब क्रमांक चार परिसरातील जानकी, केदारनाथ, गीतांजली, माउली धाम तसेच गजानन चाळ रोड या भागात गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद होते. त्यामळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड क्रमांक आठचे अध्यक्ष विनोद लोखंडे यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पथदिव्यांची दुरुस्ती सुरू केली आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी पुढील काळात अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी प्रशासनाने नियमित देखभाल आणि तत्पर सेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com