रायगडमध्ये उष्णतेचा पारा चढला

रायगडमध्ये उष्णतेचा पारा चढला
Published on

रायगडमध्ये उष्णतेचा पारा चढला
उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण; खबरदारीचे आरोग्य विभागाचे आवाहन
अलिबाग, ता. १७ (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे रायगडमधील नागरिक हैराण झाले आहेत. पुढील ४-५ दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त राहण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणत्याही व्यक्तीने (उघड्या आकाशाखाली) बाहेर जाऊ नये, कारण हवामान विभागाने सांगितले आहे की तापमान ४५ ते ५५° सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे जर कोणाला घुसमटल्यासारखे वाटले किंवा अचानक तब्येत बिघडली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरातील दरवाजे उघडे ठेवा जेणेकरून वायुवीजन होईल. मोबाईलचा वापर कमी करा, मोबाईल फुटण्याची शक्यता असू शकते. कृपया सावध रहा आणि इतरांना माहिती द्या. शक्यतो दही, ताक, बेलफळाचा रस इत्यादी थंड पेयांचा वापर करा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

चौकट :
अशी घ्या काळजी :
पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ प्या. गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नका. वीजमीटरवर जास्त भार टाकू नका. घरातील वापरात असलेल्या भागातच एसी वापरा, विशेषतः उन्हाळ्यात. दोन ते तीन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या. बाहेर तापमान ४५-४७°C असताना घरातील एसी २४-२५°C वर ठेवा, त्यामुळे आरोग्य चांगले राहील. विशेषतः सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान थेट सूर्यप्रकाश टाळा.

चौकट :
दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट :
सकाळी १० नंतरच डोक्यावर सूर्य तळपण्यास सुरुवात होत असल्याने त्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजेपर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कर्मचारी, विद्यार्थ्यांची शीतपेये, ज्यूस सेंटरमध्ये गर्दी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com