

घाटकोपरमधील अतिक्रमणे हटवली
रेल्वे स्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास
घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेतील जवाहर रोड आणि अंकुश मार्ग परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत दुकानांवर आज (ता. १७) पालिकेच्या एन विभाग पथकाने धडक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान सुमारे १० ते १२ दुकानांनी उभारलेले बेकायदेशीर शेड बुलडोझरच्या सहाय्याने हटवण्यात आले.
विशेषतः जवाहर रोड येथील एका पान दुकानावर कठोर कारवाई करत ते पूर्णपणे निष्कासित करण्यात आले. या भागातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या.
भाजप आमदार पराग शहा आणि प्रभाग क्रमांक १३१ च्या नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी त्यांनी परिसराची पाहणी करून अनधिकृत स्टॉल आणि शेड हटवण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त मारुती पवार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता पालिका पथकाने ही मोहीम राबवत अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे झाले असून, वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.