

भरारी पथकाकडून
गावठी दारू जप्त
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाने गावठी दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे भिवंडी बायपास, रांजनोली गाव, येथे गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक दबा धरून बसले होते. रात्री एका पिकअप वाहनावर संशय आल्याने त्याचा पाठलाग करून वाहन थांबवून त्याची तपासणी केली. त्यात पातळ द्रवपदार्थाने भरलेल्या ७० गोण्यांमध्ये प्रत्येकी चार प्रमाणे प्लॅस्टिक पिशव्या अंदाजे १० लिटर गावठी दारूने भरलेल्या अशा एकूण २८० प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये २,८०० लिटर हातभट्टी गावठी दारू मिळाली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात वाहनासह एकूण सात लाख ४० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून रवींद्र बबन भोईर (वाहनचालक) आणि नयन मुकंद म्हात्रे यांना अटक केली आहे. चौकशीत हातभट्टी गावठी दारू ही मौजे देसाई गाव (ता. डायघर) पोलिस ठाण्याच्या हाद्दीतून नाशिक येथे विक्रीच्या उद्देशाने जाणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.