

एज्युसिटी, मेडिसिटीतून
जागतिक दर्जाचे शिक्षण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई, ता. १८ : एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जगभरातील नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शवली असल्याने संबंधित विभाग व यंत्रणांनी कालबद्ध वेळेत या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटीसंदर्भात आज आढावा बैठक झाली. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. जागतिक पातळीवरील अनेक नामांकित विद्यापीठांनी यासंदर्भात उत्सुकता दर्शवली असल्याने या नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरू करण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
--
प्रकल्प आराखडा तयार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एज्युसिटी व मेडिसिटी आकारास येईल. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली असून प्रकल्पासाठी जागा संपादित करण्यात येत असल्याची माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली. मेडिसिटीसाठीही आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
--
स्टार्टअप आणि संशोधनाला चालना मिळणार
जगातील नामांकित आणि अग्रगण्य विद्यापीठे देशात तसेच महाराष्ट्रात आपले कॅम्पस सुरू करीत आहेत. या माध्यमातून विविध क्षेत्रांतील दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. स्टार्ट अप्सची संख्याही वाढेल. या विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील संशोधनाला चालना मिळणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.