जेएसएम व विधी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा

जेएसएम व विधी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा
Published on

जेएसएम व विधी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा
अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) : जेएसएम महाविद्यालय व ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा बुधवारी (ता. १५) उत्साहात पार पडला. याप्रसंगी जेएसएम महाविद्यालयातील २०७ तसेच विधी महाविद्यालयातील ८० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील होते, तर उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सोनाली पाटील व प्र. प्राचार्य डॉ. नीलम हजारे उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात डॉ. नीलम हजारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अनुपस्थित विद्यार्थ्यांनी ३० एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत महाविद्यालयातून प्रमाणपत्रे घेऊन जावीत, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com