मिलापनगर मध्ये कोकणातील फणसांचा दरवळ

मिलापनगर मध्ये कोकणातील फणसांचा दरवळ
Published on

मिलापनगर बनलाय ‘मिनी कोकण’
फळझाडांच्या लागवडीमुळे परिसर निसर्गरम्य

कल्याण, ता. २० (वार्ताहर) : डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर परिसर सध्या अक्षरशः ‘मिनी कोकण’ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येथील बंगल्यांच्या आवारात आंबा, फणस, चिकू, केळी, नारळ यासारख्या फळझाडांचा बहर दिसत असून, विशेषतः फणसांच्या लागवडीमुळे हा परिसर निसर्गरम्य बनला आहे.

सामान्यतः शहरी भागात फणसाची झाडे पाहण्यास मिळत नाहीत, पण एमआयडीसीसारख्या औद्योगित आणि पूर्वी प्रगूषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या परिसरात चक्क कोकणातल्या लाल मातीतील अनेक फळझाडे पाहण्यास मिळत आहेत. अलीकडे येथील प्रदूषणात काही प्रमाणात घट झाल्याने जैवविविधतेवर त्याचा थेट परिणाम दिसून येत असून, फळझाडांसाठी येथे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मिलापनगर परिसरात अनेक टुमदार बंगले असून, त्यांच्या आवारात ही फळझाडे अनेकांचे लक्ष वेधत आहेत.

येथील रश्मी विचारे, वसंत छेडा, राजू सुर्वे, वल्लभ आठवले यांच्यासह असंख्य रहिवाशांनी आपापल्या बंगल्यात फणसाची झाडे लावले असून, त्याला मोठ्या प्रमाणात फणस लागले आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली. फणस हे केवळ चविष्ट फळ नसून आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त मानले जाते. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पचन सुधारणा, हृदयविकार नियंत्रण आणि रक्तातील साखर संतुलित ठेवणे अशा अनेक गुणधर्मांमुळे फणसाचे महत्त्व अधिक आहे. विशेषतः जून महिन्यातील वटपौर्णिमा सणाच्या काळात फणसाला विशेष मागणी असते.

----------------
फळझाडांमुळे पक्ष्यांचाही वावर
कच्च्या फणसाची भाजी तसेच केळफुलांची भाजी बनवून येथील नागरिक पारंपरिक चवींचा आनंद घेत आहेत. याशिवाय आंबा, नारळ, पेरू, चिकू, केळी, पपई, जांभूळ यासारखी फळझाडेही बहरात असल्याने परिसर अधिक हिरवागार झाला आहे. या फळझाडांमुळे पोपट, साळुंकी, बुलबुल, कोकिळ यासारख्या पक्ष्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे परिसरात जैवविविधतेची चैतन्यपूर्ण झलक पाहायला मिळत आहे. दरम्यान, वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणातील असमतोलाच्या काळात अशा प्रकारे फळझाडांचा बहर आणि पक्ष्यांची वाढती उपस्थिती ही पर्यावरणासाठी सकारात्मक व आनंददायी बाब असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com