कोपरखैरणेतील सीबीएसई शाळेला मिळणार शिक्षक

कोपरखैरणेतील सीबीएसई शाळेला मिळणार शिक्षक
Published on

कोपरखैरणेतील सीबीएसई शाळेला मिळणार शिक्षक
बाह्य संस्थेमार्फत शिक्षक देण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर
वाशी, ता. १९ (बातमीदार) ः कोपरखैरणे येथील पीएमश्री नवी मुंबई महापालिका-सीबीएसई शाळा क्रमांक ९४ मधील शिक्षक भरतीचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळ या संस्थेमार्फत या शाळेत शिक्षक भरती करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी (ता. १७) स्थायी समिती बैठकीत मंजुरी मिळाली. या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
शिक्षण व्हिजन धोरणानुसार, नवी मुंबईमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या कोपरखैरणे, नेरूळ येथे सीबीएसई शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. कोपरखैरणेतील शाळेत शिक्षक भरतीचे कंत्राट नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळाला देण्याच्या प्रस्तावावरून स्थायी समितीत मोठा वादंग निर्माण झाला होता. विरोधकांनी शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रासाठी थेट दीर्घकालीन करार देण्यावर आक्षेप घेत, महापालिकेची जबाबदारी बाह्य संस्थेकडे सोपवणे योग्य नसल्याचे म्हटले होते. तसेच, प्रस्तावात पारदर्शकतेचा अभाव असल्याची टीकाही करण्यात आली होती. प्रशासनाने मात्र संबंधित संस्थेला शैक्षणिक अनुभव असल्याचे सांगत, शिक्षकांची कमतरता लक्षात घेऊन शाळा सुरळीत चालावी यासाठी हा तात्पुरता उपाय असल्याचे स्पष्ट केले. तसेच ‘पवित्र’ प्रणालीद्वारे नियमित शिक्षक भरतीचा प्रयत्न सुरू असल्याचेही नमूद केले. यानुसार चर्चेअंती या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, ३४ कोटी ९८ लाख ८५ हजार रुपयांचा १० वर्षांच्या करार पद्धतीने शिक्षक देण्यास मंजुरी दिली आहे.

वनमंत्री गणेश नाईक यांनी पालिका शाळेसाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. सर्वसामान्य घरातील मुलांना खासगी शाळेप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण सीबीएसई शाळेतून दिले जाणार आहे. कोपरखैरणेतील या शाळेत १ ते २ वर्षांकरिता शिक्षक घेतल्यास पालकांमध्ये दोन वर्षांनंतर मुलांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला असता. त्यामुळे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून १० वर्षांकरिता करार पद्धतीने ८३ शिक्षक घेतले जाणार आहेत. सीबीएसई शाळेतील शिक्षणाचा दर्जा टिकून राहून चांगले शिक्षण मिळेल.
- अशोक पाटील, स्थायी समिती सभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com